विदर्भातील पक्षीप्रेमींचा  830 कि.मी.चा सायकल प्रवास

कराड – पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने बहार नेचर फौंडेशनचे प्रा. किशोर वानखेडे व पक्षीमिञ संघटनेचे विदर्भाचे समन्वयक दिलीप विरखडे हे पक्षांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी पक्षीमिञांनी पक्षांसाठी सायकलने भ्रमंती करावी हा संदेश देत वर्ध्यापासुन सायकलने 830 कि.मी.चा प्रवास करीत शुक्रवारी सकाळी 8 वाजता कराडला पोहोचले.

कोल्हापूर नाका, महात्मा गांधी पुतळ्याजवळ कराड नगर पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी संचालक दिलीप गुरव, जिमखान्याचे जन.सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर कराड मधील अर्बन सायकल ग्रुप, संगम सायकल ग्रुप, वैभव सायकल ग्रुपच्या सदस्यांनी रॅली सुरु केली. मुख्य रस्त्याने ही रॅली दत्त चौक, चावडी चौक, कन्याशाळा, कृष्णा नाकामार्गे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन या संमेलन स्थळावर पोहोचली. या रॅलीत माधव माने, दिपक बेलवलकर, मुरली वत्स, रोहन भाटे, प्रमोद गरगटे, दीपक शहा, अनिल शहा यांच्या बरोबर अनेक सायकलपटु सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)