वित्तीय उत्पादनातील गुंतवणूक वाढली

मुंबई – डिजीटायझेनमुळे भारतात आता वित्तीय उत्पादनातील गुंतवणूक वाढू लागली असल्याचे आयसीआयसीआय सिक्‍युरिटीजचे अधिकारी अनुपम गुहा यांनी सांगीतले. ते म्हणाले की, त्यामुळे शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदाराकडून खरेदी वाढत आहे.

आयसीआयसीआय सिक्‍युरिटीजने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करण्याचे ठरविले असून, कंपनीचा आयपीओफ येत्या 22 मार्चपासून खुला होत आहे असे त्यांनी सांगीतले. ही समभागविक्री 26 मार्चपर्यंत चालणार आहे. या आयपीओफसाठी कंपनीने रु. 519 ते रु. 520 असा किंमतपट्टा जाहीर केला आहे. या इश्‍यूच्या माध्यमातून पाच रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 7,72,49,508 शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. या इश्‍यूद्वारे कंपनीची प्रवर्तक असलेली आयसीआयसीआय बॅंक आपल्याकडील हिस्सा विकणार आहे. यात आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरधारकांसाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या शेअरची मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)