विडणीमध्ये संभाजी ब्रिगेडची बैठक

विडणी – विडणी ता.फलटण येथे शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिवर्षी संघटनेच्या कार्यकरणीमध्ये फेरबदल केले जातात. त्याप्रमाणे या वर्षी विडणी संभाजी ब्रिगेडच्या शाखा अध्यक्षपदी राहूल शिर्के तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच शिवजयंती दरम्यान विविध कार्यक्रमाची संकल्पना आखताना, पुरस्कार वितरण सोहळा, शिव चरित्रावरील व्याख्याते, क्रीडापटू , आदी बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, युवा उद्योजक सचिन भोसले, नुतन शाखा अध्यक्ष, राहुल शिर्के, प्रशांत लाड, अजित भोसले, दत्ता निकम, सचिन पवार, पंकज शिंदे, विजय बेडके, दत्तात्रय पवार, संकेत शिर्के, प्रकाश इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)