विडणीजवळ तिघे जागीच ठार

जीमला जाताना काळाचा घाला : अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरले

विडणी, दि. 15 (वार्ताहर) – विडणी, ता. फलटण येथे व्यायामशाळेत दुचाकीवरून निघालेले तीन युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. दरम्यान, पहाटेच्या वेळी रस्ता निर्जन असल्याले संबंधित वाहन चालक घटनास्थळरवरून पसार झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विडणी येथील अक्षय रामचंद्र नाळे (वय 23), राहूल रवींद्र नाळे (25), अमित बबन नाळे वय (24) हे तीन युवक पहाटे साडेपाच वाजता दुचाकीवरुन पिंपरद येथील जीममध्ये व्यायामासाठी निघाले होते. महाड-पंढरपूर महामार्गावरुन जाताताना विडणी हद्दीतील अष्टविनायक रोपवाटिका नजिक पहाटे त्यांच्या दुचाकीला (एमएच 12 जीसी 6754) अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती तिघेजी जागीच ठार झाले. दुचाकीचा चक्काचूर झाला तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातावेळी आसपास लोकवस्ती नसल्याने प्रत्यक्ष दर्शनी पाहणारे कुणीही नव्हते. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. यामुळे अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला.
सकाळी फिरायला जाणाऱ्या गावातील लोकांना अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिस पाटलास याबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि निरिक्षक सजन हंकारे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन अपघाताची माहिती घेतली. मृत युवकांबाबत चौकशी केली असता तिघेही विडणी येथील सावतामाळी मळा येथील असल्याचे समजले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून अपघाताची घटनेची फिर्याद पद्‌माकर सोनवणे यांनी दिली असून याबाबत तपास पी.एस.आय राहूल भोळ करत आहेत.

विडणी गावात सन्नाट्टा
गावातील तीन युवकांच्या अपघाती निधनाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी घटनास्थाळी धाव घेतली. अपघातातील युवक जागीच ठार झाल्याचे समजताच विडणीत सन्नाट्टा पसरला. लोकांनी दुकाने बंद ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)