विठ्ठल मंदिरात काकड आरतीचे स्वर

लोणी काळभोर- येथील विठ्ठल मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली काकड आरतीची परंपरा मोठ्या भक्तीभावाने सुरू असून दररोज पहाटे वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून परमेश्वराची प्रार्थना भाविक भक्त श्रद्धेने करीत आहेत.
येथील विठ्ठल मंदिरात गेली अनेक वर्षे कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा असा सलग महिनाभर वैष्णवांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या वेळी वारकरी भजनी मालिका, त्यातील अभंग, गवळणी, आंधळे पांगळे, वासुदेव आदी प्रकार मोठ्या भक्तीभावाने केले जातात. या सर्वांचा शेवट भैरवी म्हणून केला जातो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश दादा काळभोर हे करीत आहेत. ह.भ.प. विनोदमहाराज काळभोर, ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज बोरकर, ह.भ.प. दत्तात्रय महाराज, ह.भ.प. उत्तम खोले महाराज, महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा बेबीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा सोहळा सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)