विठ्ठल-बिरदेवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न : 50 टन भांडाऱ्याची उधळण

– सतेज औंधकर

कोल्हापूर – श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावाच्या चांगल भलंचा जयघोष, धनगरी ढोलाचा निनाद आणि भंडाऱ्याच्या उधळणीत रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली इथल्या श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेवाची यात्रा संपन्न झाली. लाखों भाविकांच्या उपस्थितीत यात्रेचा मुख्य भाकणूकीचा धार्मिक सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश राज्यातून लाखों भाविकांनी हजेरी लावली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री क्षेत्र पट्टणकडोलीतील विठ्ठल-बिरदेव मंदिर हे महाराष्ट्रातील धार्मिक संस्कृतीचं प्रतिक मानलं जातं. तसेच महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान राज्यातील लाखो भाविकाचं विशेषत: धनगर बांधवाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. या यात्रेतील मुख्य भाकणूकीच्या सोहळयाला प्रारंभ होण्यापूर्वी मानाच्या दोन तलवारीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यावेळी मंदिरासमोरील दगडी गादीवर स्थानापन्न झालेले मुख्य भाकणूक कथन करणारे फरांडेबांबाच्या भेटीला आले. यावेळी फरांडेबाबाना श्रीच्या दर्शनाचे आमंत्रण देत गळा भेटीचा सोहळा पार पडला. तसेच मानाच्या तलवारीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर फरांडेबाबा हेडाम नृत्याला सुरुवात केली. यावेळी उपस्थित भाविकांनी धनगरी ढोलाचा आणि कैताळांचा निनादामध्ये मुक्तपणे भंडारा, खारीक, खोबर्‍याची उधळण करीत, श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावाने चागभलचा जयघोष केला. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे अवघ्या आसमंताला  सोनेरी झळाळी  प्राप्त झाली होती.

फरांडेबाबा श्री मरगुबाई मंदीर, श्रीच्या मंदीराच्या पाठीमागील बाजूने नारायण गावडे मंदीर या मार्गाने हेडाम नृत्य करीत, श्रीच्या मुख्य मंदीरामध्ये आले. या ठिकाणी काही वेळ हेडाम नृत्य केल्यानंतर फरांडेबाबांनी संपूर्ण भाविकांचे लक्ष लागून राहिलेली भाकणुक कथन केली. श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेतील मुख्य भाकणूकीचा धार्मिक सोहळा आज पार पडला असला, तरी ही यात्रा आजून आठ दिवस चालणार आहे. यात्रेनिमित्याने येथील भाणस मंदिरामध्ये असलेले श्रीच्या मुर्ती पहाटे चार वाजण्याच्या सुमारास समस्त पुजारी बांधवानी घंटीच्या निनादामध्ये आणली जाते. त्यानंतर श्रीची अंलकार रुपातील विधीवत पुजा बांधून आरती केली. त्यानंतर मंदीर भाविकांच्यासाठी खुल केलं जातं.

हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी आणि श्रीच्या दर्शनासाठी यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. या देवस्थानच्या यात्रेत धनगरी घोंगड्याचा बाजार देखील मोठा भरला जातो. याला देखील मोठा प्रतिसाद भाविकांनी दिला आहे. या यात्रेतील मुख्य भाकणुकीच्या सोहळा कालावधीत भाविकानी सुमारे ५० टनाच्या भंडाऱ्याची उधळण केली. या उधळणीमुळे मंदीर परिसरातील रस्त्यावर मोठा खच पडलेला पाहायला मिळतो. दरवर्षी पट्टांकोडोली इथं येणाऱ्या भविकांनाची संख्या वाढताना पाहायला मिळतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)