पिंपरी – विठ्ठलाच्या दर्शनासाठी धावतेय शिवशाही

पिंपरी – आगाराचा महसूल कसा वाढावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे (एस.टी) सर्वच आगार वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच काही प्रयोग पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर एस. टी. आगाराने करत पंढरपूरसाठी आता साध्या बस ऐवजी शिवशाही बसची फेरी सुरू केली आहे.

वल्लभनगर आगारातून पंढरपूर करीता 4 साध्या बस गाड्याच्या फेऱ्या होत्या. त्यात, सकाळी 3 फेऱ्या तर दुपारी एक असे वेळापत्रक आहे. मात्र, आता दुपारी साडेतीनच्या फेरीसाठी साध्या बस ऐवजी शिवशाही बस रविवारपासून (दि. 27) सुरू करण्यात आली आहे. याबाबत वल्लभनगर आगार प्रमुख संजय भोसले यांनी माहिती दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरु करण्यात आलेल्या शिवशाही बसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यासाठी तुळजापूरची शिवशाहीची फेरी रद्द करत त्याऐवजी पंढरपूरसाठी वळवण्यात आली आहे. तर तुळजापूरच्या शिवशाहीच्या फेरी ऐवजी साधी बस फेरी सुरु करण्यात आली आहे. तुळजापूरच्या शिवशाहीच्या बसला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)