विठ्ठलवाडी गाव होतेय विजेबाबत स्वयंपूर्ण

शिक्रापूर- श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) हे गाव विजेबाबत स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून, याबाबत एक पाऊल पुढे टाकत गावामध्ये एका वर्षात 5 हजार 400 युनिट वीजनिर्मिती करून सुमारे 43 हजार 200 रुपयांची बचत करून आदर्श निर्माण केला आहे.
श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर ) येथे बाजार समितीचे माजी संचालक राहुल गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विजेची बचत करत वीज जपून वापरण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आणि सरपंच ललिता गाडे, उपसरपंच बाबाजी गवारे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अनोखा उपक्रम करत वीज बचतीसाठी अपारंपरिक ऊर्जास्त्रोतापासून निर्मिती केली तसेच ग्रामपंचायतच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी 1 लाख 2 हजार रुपये खर्च झाले आहेत. ग्रामपंचायत तसेच गावातील चार अंगणवाड्यांसाठी एक लाख रुपये खर्च करून सौर ऊर्जानिर्मिती केली आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी माजी सरपंच अलका राऊत, माजी उपसरपंच दिलीप गवारे, राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जयेश शिंदे, तानाजी मारणे, कौशल्या हंबीर, सुजाता शेलार, प्रियांका पवार यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर राबविण्याल्यानंतर विठ्ठलवाडी महानुभावमळा, पुनर्वसन वस्ती, भोसेवस्ती या चार ठिकाणच्या विजेपासून वंचित अंगणवाड्यांमध्ये सदर प्रकल्प बसविल्याने पहिल्यांदाच अंगणवाड्या उजळल्या आहेत. या पैकी एका अंगणवाडीसाठी प्रतीदिवशी एक युनिट तर ग्रामपंचायतसाठी पाच युनिट वीजनिर्मिती होत आहे, तसेच ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के निधीतून दलितवस्तीसाठी 750 लिटरचा सोलर हिटर बसविल्याने दहा कुटुंबियांसाठी गरम पाणी उपलब्ध होत आहे.

  • वीज बचत उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती केल्याने संगणक, प्रिंटर, पंखे आणि इतर इलेक्‍ट्रिक उपक्रमे यापुढे विनाखर्चिक अखंडितपणे चालू राहणार असल्याने ग्रामपंचायतीला विजेचे बिल भरावे लागणार नाही त्यामुळे ग्रामपंचायतची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.
    ललिता गाडे, सरपंच, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर)
  • पर्यावरणाचा ऱ्हास थांबला – उपसरपंच
    विठ्ठलवाडी गावामध्ये शंभर कुटुंबांनी सोलर हिटर बसविल्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबला असून भविष्यात अपारंपरिक ऊर्जेसंदर्भात विविध प्रकल्प राबविण्याचा संकल्प आहे.
    – बाबाजी गवारे, उपसरपंच, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)