विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प कात टाकणार

पिंपरी – महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विठ्ठलनगर येथील घरकुल प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामधील ए-8 व ए-9 या दोन इमारतींमध्ये स्थापत्य, विद्युत, पाणी पुरवठा व जल नि:सारण विषयक कामे होणार आहेत. याकरिता सुमारे 2 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या विषयाचा प्रस्ताव बुधवार दि. 31 ला स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले आहेत. शहरात घोषित व अघोषित सुमारे 72 झोपडपट्ट्या आहेत. यामध्ये पिंपरीतील विठ्ठलनगरला एक प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पातील दोन इमारतींमध्ये काही कामे रखडली होती. त्यामुळे त्या इमारतीतील विविध कामे करण्यात येणार आहेत.

-Ads-

दापोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याचे काम एका कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना 2 कोटी 7 लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच कासारवाडीतील मैला शुद्धीकरण केंद्राच्या चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामही करण्यात येणार आहे. महापालिका पाणी पुरवठा विभाग जल नि:सारण नलिकांमध्ये सुधारणा करणार आहे.

पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 61 मधील बुद्ध विहाराशेजारील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 71 लाख 68 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. आकुर्डी गावठाण, गंगानगर परिसरात जल नि:सारण नलिका सुधार विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 34 लाख रुपये खर्च येणार आहे. येत्या बुधवारी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी प्रस्ताव ठवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)