‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील भाविक देवदर्शनासाठी खासगी बसेसला पसंती देत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यातून त्यांना वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे. हाच फायदा मिळविण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. त्यासाठी खास देवदर्शनासाठी “विठाई’ बस सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून या पहिल्या बसची दापोडी येथील वर्कशॉपमध्ये बांधणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 5 ते 6 महिन्यांत तब्बल 1 हजार बस तयार करण्यात येणार आहेत. या बसेसच्या माध्यमातून भाविकांना अष्टविनायक यात्रेप्रमाणेच खास पॅकेज देण्यात येणार आहे.

राज्याच्या विविध भागात धार्मिक यात्रांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यातही पंढरपूरची वारी ही सर्वांत मोठी यात्रा असून या माध्यमातून महामंडळाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने काही वर्षांपूर्वी धार्मिक पर्यटनांसाठी राज्याच्या विविध भागात बससेवा सुरू केली होती. त्यातूनही महामंडळाला अपेक्षेपेक्षाही अधिक महसूल मिळत होता. या खास बसेस नसतानाही धार्मिक यात्रांच्या माध्यमातून महामंडळाला अपेक्षित महसूल मिळत आहे. त्यानुसार 2015-16 या आर्थिक वर्षात महामंडळाला 92 लाख प्रवाशांच्या माध्यमातून 60 कोटी तर, 2016-17 या आर्थिक वर्षात 2 कोटी 86 लाख प्रवाशांच्या माध्यमातून 67 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, बसेसची कमी संख्या आणि महामंडळावर वाढत चाललेला आर्थिक भार यामुळे या बसेस बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. त्याचा फायदा घेत खासगी बसचालकांनी धार्मिक पर्यटनावर सर्वाधिक भर देत भाविकांना अधिकाअधिक दर्जेदार सेवा देण्यास सुरुवात केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्याच्या परिस्थितीत पंढरपूर ते व्हाया तुळजापूर आणि अक्‍कलकोट तसेच औरगांबाद जिल्ह्यातील अजंठा आणि वेरुळ या बससेवा वगळता अशा कोणत्याही धार्मिक स्थळांसाठी एसटी बसची कोणतीही सेवा नाही. परिणामी महामंडळाचा महसूल निम्म्याने कमी झाला आहे, नेमकी याच संधीचा फायदा घेऊन खासगी बसचालकांनी या मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसची बांधणी पूर्ण झाल्यानंतर ही बस लवकरच ताफ्यात आणण्यात येणार आहे. यासंदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, प्रवाशांना अधिकाअधिक दर्जेदार सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. या संकल्पनेतूनच ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची लवकरच प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अशा मिळणार सुविधा…!
– प्रवाशांकडून अंतरानुसार ठरावीक पॅकेज घेणार
– प्रवाशांना प्रवासात सुरक्षा पुरविणार
– जेवण, नाष्टा, चहा आणि निवासाचीही सोय
– बसमध्ये सीसीटीव्हीची राहणार नजर
– सीडी आणि एलईडी टीव्हीच्या माध्यमातून ऐकता येणार भक्‍तिगीते आणि कीर्तन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)