विज्ञान स्पर्धेत अण्णासाहेब अवटेचे अव्वल यश

  • येडगाव येथे विज्ञान मेळाव्यात विज्ञान नाट्यस्पर्धा उत्साहात

नारायणगाव – अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याच्या अनुषंगाने तालुकापातळीवरील विज्ञान नाट्यस्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ कुकडी व्ह्यॅली इंग्लिश मीडियम स्कूल, येडगाव (ता. जुन्नर) येथे उत्साहात पार पडला. यात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाग घेऊन कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत अण्णासाहेब आवटे विद्या मंदिरने पहिला क्रमांक पटकाविला असल्याचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी सांगितले.
पंचायत समिती जुन्नर आणि जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा झाल्या. बाल वैज्ञानिकांना विचारांचे आदान-प्रदानाची संधी देणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे विनायक खोत यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
या स्पर्धेत अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर – जुन्नर (प्रथम), गुरुवर्य रा. प. प. सबनीस – नारायणगाव (द्वितीय) आणि सद्‌गुरू सीताराम महाराज विद्यालय – पिंपरी पेंढार (तृतीय), तसेच न्यू इंग्लिश स्कूल – शिरोली बोरी आणि कुकडी व्ह्यॅली पब्लिक स्कूल – येडगाव (उत्तेजनार्थ) अशी बक्षिसे मिळवली आहेत.
यावेळी विस्तार अधिकारी ए. डी. शिंदे, कुकडी व्ह्यॅली पब्लिक स्कूलचे सचिव विष्णू थोरवे, विषय तज्ज्ञ एस. आर. गुंजाळ, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे खजिनदार बी. के. नलावडे, संचालक प्रवीण ताजणे उपस्थित होते. शिवाजी ट्रेल आणि हिस्ट्री क्‍लबचे विनायक खोत, संजय कुटे व जेजुरकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)