विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावरच देश बदलू शकतो – डॉ. आगरकर

पिंपरी – विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावरच देश बदलू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी चिंचवड येथे केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ जागतिक गणित तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. अशोक नगरकर यांचे चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवा वैज्ञानिक अंकिता नगरकर हिला 12 पेटंट मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. अशोक नगरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून अनेक शोधांची उदाहरणे दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ एडिसन, नोबेल यांनी लावलेल्या शोधांबद्दल माहिती सांगितली. यावेळी नगरकर व त्यांची कन्या युवा शास्त्रज्ञ अंकिता नगरकर हिने देखील स्वत: लावलेल्या वैज्ञानिक शोधाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी एका छोट्या पण रोजच्या जीवनात लागणाऱ्या स्टेपलरच्या पिना संपल्यावर जो कामाचा खोळंबा होतो, त्यावर पर्याय म्हणून स्टेपलरच्या पिनांना शेवटी रंग लावल्यास पिना संपत आल्याचे लक्षात येते. या व अशी इतर अनेक उदाहरणे देऊन दैनंदिन व्यवहारात छोटे छोटे शोध आपणच कसे लावू शकतो हे त्यांनी सांगितले.

संस्थेचे कार्यवाह ऍड. सतिश गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. दिगंबर ढोकले, संस्थेचे सदस्य अशोक पारखी, गतिराम भोईर, आसाराम कसबे, प्रा. निता मोहिते, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, अतुल आडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. सतिश गोरडे यांनी क्रांतिगुर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील चित्रपटासाठी अर्थसहाय्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)