विज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत : इनामदार

वाठार : विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात यश मिळविल्याबद्दल नारायण सातपुते यांचा सत्कार करताना सभापती फरिदा इनामदार समवेत आबासाहेब पवार, उषा साळुंखे व इतर.

वाठार, दि. 21 (वार्ताहर)- विज्ञानामुळे अंधश्रध्दा निर्मुलनास मदत होते. म्हणूनच दैनंदिन जिवनात विज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या अशा या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास होऊन विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, असे मत पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार यांनी व्यक्त केले.
वाठार ता.कराड येथील दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालय व डी. के. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार होते. गटशिक्षणाधिकारी उषा साळुखे, पंचायत समिती सदस्य ऍड. शरद पोळ, विस्तारअधिकारी जमिला मुलाणी, आनंद पळसे, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष अधिकराव पाटील, केंद्रप्रमुख बाजीराव पाटील, सुवर्णा मुसळे, विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आबासाहेब पवार म्हणाले, विविध समस्या निवारण्याच्या दृष्टीकोनातून वैज्ञानिक उपकरण बनविले पाहिजे. आपण बनविलेल्या उपकरणामागे कोणते विज्ञान आहे याचाही विचार केला पाहिजे.
विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केलेल्या उपकरणांची नावे व क्रमांक पुढीलप्रमाणे, प्राथमिक गट प्रथम क्रमांक -निरंजन पाटील, उंब्रज (कृषि व जैविक शेती), द्बितीय क्रमांक – अथर्व थोरात, विंग (आरोग्य व स्वच्छता), तृतीय क्रमांक – श्रेया शेवाळे (वडोली निळेश्वर). माध्यमिक गट प्रथम क्रमांक – वेदांती पाटील, नांदगाव (इंधन बचत), द्वितीय क्रमांक – स्वरूप जगताप, कराड, तृतीय क्रमांक -सिध्दी पाटील, वाठार.
शैक्षणिक साहित्यनिर्मितीमध्ये प्राथमिक विभागात काशिनाथ नारायण पालकर शाळा कराड प्रथम, द्वितीय क्रमांक – नारायण सातपुते पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा कासारशिरंबे (गणित व भुमितीय संकल्पना उपकरण) यांनी मिळवला.
माध्यमिक विभागामध्ये का. ना. पालकर शाळा कराड प्रथम क्रमांक, द्वितिय क्रमांक शाहिन हायस्कूल कराड, तसेच लोकसंख्या शिक्षण गटात केदार हायस्कूल सुपने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रदर्शन कालावधीत याव्यतिरिक्‍त निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचेही बक्षीस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य शरद कांबळे यांनी केले. सुत्रसंचलन सौ. गुरव यांनी केले.

सलग चार वर्षे विज्ञान प्रदर्शनात मिळवले यश
कासारशिरबे ता. कराड येथील जिल्हा परिषद शाळेचे गणित-विज्ञानचे शिक्षक नारायण सातपुते यांनी सलग चार वर्षे विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीत विविध उपकरणे मांडत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचे तालुक्‍यात सर्वत्र कौतुक होत आहे. यावर्षी वाठार येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गणित व भुमितीय संकल्पना या विषयावरील आधारीत गणितीय उपकरण मांडले होते. या उपकरणालाही त्यांना प्रथम क्रमांक मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)