विज्ञान प्रदर्शनातून ग्रामीण भागात शास्त्रज्ञ घडतील – डॉ. जे. के. सोळंकी

कापूरहोळ- पालक आपल्या मुलांना नोकरी करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मुले संशोधन वृत्तीपासून दूर होत आहेत. जेष्ठ संशोधक सी. व्ही. रमण यांच्यानंतर देशाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. ही मोठी खंत आहे. मुलांनी स्मार्ट नेस, संस्कार यांचा उपयोग देशासाठी करावा. समाजातील विविध समस्या समजावून घेऊन त्याची उत्तरे मुलांनी लहान वयात शोधण्याचा प्रयत्न केला तर ते पुढे जाऊन विविध क्षेत्रात नवनवीन शोध घेण्याचा ध्यास घेतील. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व राज्य सरकारच्या वतीने इन्स्पायर ऍवॉर्ड प्रदर्शनाचा उपक्रम राबवला जात आहे. या मधून निश्‍चित नवीन शास्त्रज्ञ घडतील, असा विश्‍वास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल ऍड रिसर्चचे जेष्ठ संशोधक जे. के. सोलंकी यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य सरकारचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विद्या प्राधिकरण पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नसरापूर येथे इन्स्पायर ऍवॉर्ड प्रदर्शन आयोजित केले होते. याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रदर्शनात जिल्ह्यातील 451 शाळेमधील एक हजार पाच इन्स्पायर ऍवॉर्ड मधून 926 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधून 93 प्रकल्प राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवडण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी एन. आय. एफ.चे मनीष भोईर, रोहन कदम, पार्थ पवार, मधुर पाटील, अमोल जाधव, प्रियांका खोले, डॉ. बाला प्रसाद, जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, भोर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अशोक गोडसे, माजी अतिरीक्त आयुक्त रोहीदास कोंडे, प्राचार्य प्रेमलता भैमी, आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)