विज्ञानाविषयी असणारे कुतूहल जाणून घ्या

भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात

मंचर- विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना विज्ञानाविषयी असणारे कुतूहल जाणून घेतले पाहिजे. विज्ञान आणि गणिताच्या माध्यमातून शास्त्रज्ञ तयार होतो आणि त्यांना जगात सर्वच ठिकाणी मागणी आहे, असे मत भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी व्यक्त केले.
चिंचोली-कोकण्याची (ता. आंबेगाव) येथील जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कुल येथे आंबेगाव तालुका विज्ञान व गणित प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, गटशिक्षण अधिकारी पोपट महाजन, सरपंच विलास कोकणे, बबन कोकणे, स्कुल कमिटी अध्यक्ष किसन कोकणे, मुख्याध्यापक विजय हगवणे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी सिद्धीविनायक ट्रस्टचे सचिव संजीव सैद पाटील, प्राचार्य इंद्रजीत जाधव, डॉ. ऋता काळे, सरपंच विलास कोकणे, संस्थेचे अध्यक्ष रामदास घोलप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डी. के. खराडे यांनी केले. सूत्रसंचालन ए. पी. कोकणे आणि पी. आर. फुंदे यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)