विज्ञानाने मानवी जीवनात बदल घडविले

मंचर- विज्ञानाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणले. मानवी जीवनाला गती मिळाली. त्यामुळेच जगाने प्रगती साधली, असे मत मुंबई-माटुंगा येथील रसायन व तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरु पद्मश्री डॉ. गणपती यादव यांनी व्यक्त केले. मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात रयत शताब्दी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना डॉ. यादव बोलत होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड होते. डॉ. गणपती यादव म्हणाले की,, विज्ञान नेहमी जात, धर्म, पंत, प्रांत यांच्या पलिकडे कार्यरत असून ते सातत्याने सत्याच्या शोधात असते. यातुनच व्यक्ती खऱ्या अर्थाने ज्ञानसंपन्न होतो, म्हणूनच आजच्या तरुणांनी वैज्ञानिक सत्याची कास धरायला हवी. प्रा. डॉ. नानासाहेब गायकवाड म्हणाले की, ग्रामीण भागातुन उद्याचे वैज्ञानिक तयार होण्यासाठी बालपणापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोण विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवा. तरच मानवी कल्याणासाठी विज्ञानाचा उपयोग झाला, असे म्हणता येईल. प्रास्ताविक प्रा. डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी केले तर प्रा. वैशाली सुपेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)