विज्ञानाच्या अभ्यासक्रमापेक्षा कृतीशीलतेवर भर देणे आवश्‍यक!

पिंपरी – जीवन आणि विज्ञान यांची सांगड घालताना विज्ञानाच्या अभ्यासक्रमापेक्षा कृतीशीलतेवर भर देणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी स्वत: आत्मविश्वासाने विज्ञान प्रकल्प तयार करतील, असे मार्गदर्शन शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना काय देता येईल? यापेक्षा त्यांच्याकडून आपणांस काय साध्य करून घेता येईल, याचा सारासार विचार विज्ञान शिक्षकांनी करावा. यातूनच बालशास्त्रज्ञ निर्माण करावेत, असे प्रतिपादन उप शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी 44 व्या तालुका विज्ञान कार्यशाळेत केले.

चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये आकुर्डीतील नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आकुर्डी व पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघ, सायन्स पार्क यांच्या विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या कार्यशाळेत अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे, नवनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. अश्विनी दाभाडे, सायन्स पार्कची शिक्षण अधिकारी कासार, विज्ञान संघाचे संजय वाखारे, सायन्स पार्क सहाय्यक शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक साधना दातीर, भसे, कलंत्रे, मिश्रा, तालुक्‍यातील मुख्याध्यापक व विज्ञान अध्यापक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कृतीशीलतेची गरज आहे. वृक्षवृद्धी, कृषी पर्यटन-संशोधन-उत्पादन, जलयुक्‍त शिवार, कचरा व्यवस्थापन, अतिवृष्टी, दुष्काळ, घन कचरा, पर्यावरण संतुलन, अन्न सुरक्षा या विषयावर सखोल संशोधन करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन सायन्स पार्कचे शिक्षण अधिकारी कासार यांनी केले. विविध उपक्रमातून कृतीशील, नियोजन पूर्वक यशस्वी विज्ञान प्रदर्शन साकारण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. अश्विनी दाभाडे यांनी केले. पोटे, भसे यांनी कार्यशाळेत यावेळी मार्गदर्शन केले. प्रतिभा भागवत यांनी प्रास्ताविक केले. राहुल वांगेकर यांनी निवेदन व प्राचार्य साधना दातीर यांनी परिचय करून दिला. संगीता भोळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)