विज्ञानविश्‍व: खा(न)देश पार्टी

मेघश्री दळवी

आमच्या देशात हजारो पक्ष आहेत. नाराजांनी, बंडखोरांनी, घरभेद्यांनी, फितुरांनी, संधिसाधूंनी आपल्याला हवे तेवढे आणि हवे तसे पक्ष काढले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्हीदेखील एक राजकीय पक्ष काढण्याचे ठरविले आहे. आम्ही आमच्या पक्षाचे खादेश पार्टी’ असे नामकरण केले आहे. खरेतर आम्ही खान्देशपार्टी असे नामकरण करणार होतो. पण अर्ज करताना त्यातील न गळाला आणि निव्वळ खादेश उरले. अर्थात, आमच्या मनात जे सुप्त हेतू दडलेले आहेत ते पाहता आम्हाला खादेशच नाव अधिक समर्पक वाटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खादेश पार्टी या आमच्या पक्षाचे अल्पनाम खादेपा होते. पण कोणी त्यातून खांदेपालट असा अर्थ घेऊ नये. कारण पिढ्यामागून पिढ्या जातील; पण आम्ही आमच्या पक्षात कोणताही खांदेपालट होऊ देणार नाही. आज आम्ही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असून आमच्या मागे आमचे चिरंजीव आणि त्यांच्यामागे त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्यामागे…….असेच पिढ्यानपिढ्या चालत राहील. हा आमचा खाजगी पक्ष असल्यामुळे आम्ही कोणतीही निवडणूक लढवली नाहीतरी पक्षाचा रिमोट आमच्याच हाती राहील. आम्ही बटणे दाबू त्यानुसार कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे नेते काम करतील.

आश्‍वासनारुढ नेता हे आमच्या पक्षाचे चिन्ह असणार आहे. कोणी सनाखोडून आश्वारूढ अथवा आणि सखोडून श्वानारुढ असे वाचून आमची चेष्टा करू नये. आश्वासन हा कोणता प्राणी आहे असेही विचारू नये. मेक इन इंडियाचा सिंह जसा यंत्रांच्या अनेक सुट्या भागांपासून बनलेला आहेत द्वत आमच्या पक्षाच्या चिन्हातील प्राणी वेगवेगळी आश्वासने एकत्र करून बनवलेला आहे.

पक्ष मोठा करण्यासाठी, पक्षाची धुरा वाहण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी फार बुद्धिमत्ता लागत नाही हेही आमच्या लक्षात आले आहे. हिंदुस्थानच्या गेल्या सत्तर वर्षांच्या राजकारणाचा आम्ही बारकाईने अभ्यास केला तेव्हा पुढील गोष्टी आमच्या लक्षात आल्या –

1)तुम्हाला सत्तेत यायचे असेल तर सत्ताधाऱ्यांवर सतत आरोप करत राहा.
( ते खोटे असले तरी चालतात.)
2) दुसऱ्याला चोर चोर म्हणत राहा. लोक आपोआप त्याला चोर आणि तुम्हाला साव मानू लागतात ( तुम्ही चोर असलात
तरी)

3) शेतमालाला भाव मिळाला की, शहरातल्या मतदारांच्या कळवळा आल्यासारखे महागाईच्या विरोधात शंख करा.
4) सगळे काही स्वस्त असेल तेव्हा शेतकऱ्यांचे कैवारी असल्याच्या थाटात शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोंब ठोका.
5) जनता उपाशी राहिली तरी चालेल; पण तिला आश्वासने देत रहा. (गरिबी हटाव, कर्जमाफ़ी आणि प्रत्येकाला नोकरी हे हुकमी एक्‍के. )
6)प्रांतवाद, जातीयवाद आणि भाषेचे मुद्दे पुढे केल्यास प्रदेशानुरूप नक्कीच फायदा होतो.
खादेश पार्टी हा आमचा पक्ष सर्वात अधिराज्य स्थान नाम कमवत निवडणूक लढवेल. कारण तिथे सत्तेत असणाऱ्या पक्षाने काम केले तरी त्याची सत्ता टिकत नसते आणि एखादा पक्ष अजिबात काम करत नाही हे माहीत असूनही जनता त्या पक्षाला सत्तेत बसवत असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)