विजेच्या लपंडावामुळे मुळशीकर त्रस्त

पिरंगुट – मुळशी तालुक्‍यात सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. असा विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे मुळशीकर त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात वीज गायब होत असल्याने मुळशीकर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त करीत आहेत. मुळशी तालुक्‍यात गेल्या चार दिवसांपासून वारंवार वीज गायब होत आहे. रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी विज गायब होत आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. परंतु महावितरणच्या गलथान कारभारामुळे सतत विज गायब होत आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुळशीमधील असलेल्या पिरंगुट, लवळे, भूगाव, भुकुम, कासारआंबोली, भरे, उरावडे, घोटावडे, अंबडवेट, शिंदेवाडी, सुतारवाडी या गावांमध्ये आणि गावांच्या आजूबाजूच्या वाड्यावस्त्यावर तसेच तालुक्‍याच्या इतर भागात अनेकदा तास्‌नतास वीज गायब होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुळशी तालुक्‍यातील पिरंगुट गाव हे मुळशी तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीची पंढरी आहे. आजूबाजूच्या परिसरातील गावामध्ये अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. बहुतांशी सर्व कारखाने हे येथील विजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे सतत वीज गायब होणे आणि विजेचा सुरु असलेला लपंडाव यामुळे याचा मोठा आर्थिक व मानसिक फटका हा येथील कारखान्यांना व त्यामधील काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)