विजेच्या धक्‍क्‍याने 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

पिंपरी  – घरातील हिटरच्या विजेच्या धक्‍क्‍याने 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रावेत येथे मंगळवारी (दि.4) दुपारी पावणेचार वाजता घडली. दिव्या कैलास गराड (वय-4 रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मयत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गराड हे मजुरीचे काम करीत होते तर त्यांच्या पत्नी या गृहीणी आहेत. गराड कुटुंबीय हे शिंदेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होते. मंगळवारी ते रहाते घर बदलत होते. त्यामुळे घरात सर्वत्र समान पसरलेले होते. सामान हलवण्याच्या घाईत घरातील पाणी तापवायचे हिटर हे चालूच राहीले होते. यावेळी दिव्या तेथे खेळत-खेळत आली व तीने हिटरला हात लावला. त्यामुळे तिला जोराचा झटका बसला व ती जागीच बेशुद्ध झाली. पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला वायसीएम रुग्णालयात येथे दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषीत केले. गराड यांना दिव्या पेक्षा पण छोटी दोन वर्षाची आणखी एक मुलगी आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून. घरातील विजेच्या गोष्टी लहानमुलांपासून दूर ठेवणे गरजेजे आहे. पिंपरी येथील एका घटनेत देखील टिव्हीचा विद्यूत प्रवाह कपाटात उतरला असताना चिमुकल्याने कपाटाला हात लावला व त्याचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे पालकांनी मुलांबरोबरच घरातील विद्यूत उपकरणांची देखील काळजी घेण गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)