विजेचा बेकायदा वापर करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

कवठे येमाई- मलठण (ता. शिरूर) येथील पोपट पाडुंरग गायकवाड यांना शेतात पडलेल्या विजेच्या तारांतून शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना फेब्रुवारी 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी सुनील पोपट गायकवाड यांनी शिरूर पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली होती. पोलीस आणि महावितरणच्या तपासाअंती हलगर्जीपणाने आणि बेजबाबदारपणाने विजेचा वापर करून पोपट पाडुंरग गायकवाड यांच्या मृत्यूस कारण ठरल्याप्रकरणी मलठण (ता. शिरूर) येथील मोहन किसन गायकवाड, संपत किसन गायकवाड, गोकुळ किसन गायकवाड अशा तीन जणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली.
मलठणचे माजी उपसरपंच सुरेश गायकवाड यांचे भाऊ पोपट पाडुंरग गायकवाड हे 8 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच्या शेतात काम करीत असताना मोहन गायकवाड, संपत गायकवाड, गोकुळ गायकवाड यांनी घेतलेल्या अनधिकृत सिंगल फेज कनेक्‍शनमुळे (आकडा टाकून) शेतात पडलेल्या तारेत असलेल्या विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाला असल्याबाबत शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. 8 फेब्रुवारी 2018 ला मलठण गावात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 3 फेज लोडशेडिंग होते; परंतु मोहन गायकवाड, संपत गायकवाड, गोकुळ गायकवाड यांनी वीज चोरी करून बेकायदेशीर आकडा टाकलेल्या सिंगल फेज मोटर चालू असल्यामुळे तुटलेल्या न्युट्रल तारेमध्ये वीजप्रवाह आल्यामुळे पोपट गायकवाड यांचा मृत्यू झाला असल्याचे झालेल्या चौकशीअंती आणि तपासात स्पष्ट झाल्याने वरील तिघांविरोधात शिरूर पोलिसांतगुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)