विजेचा धक्‍का लागून युवकाचा मृत्यू

सोमेश्‍वरनगर- चार दिवसांवर विवाह येऊन ठेपलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. स्वप्निल आनंदराव धायगुडे(वय 23) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरातील पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू करून स्वप्निल घरात येत होता. यावेळी त्याचा पाय वीजवाहक तारेवर पडला. यामध्ये विजेचा जोरदार धक्‍का बसून तो जागेवरच कोसळला. त्यावेळी त्याच्या घरात कोणीच नसल्याने आणि शेजाऱ्यांनाही याची कल्पना नसल्याने सुमारे एक तास तो तसाच पडून होता. यानंतर शेजाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्याला वाघळवाडी येथील एका दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. स्वप्निलचे चार दिवसांनंतर लग्न होणार होते. या घटनेनंतर सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)