विजेचा धक्का लागून शेतकरी जखमी

देऊळगाव राजे- देऊळगाव राजे वीज उपकेंद्रांतर्गत काम करणाऱ्या वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा शॉक लागून हिंगणी बेर्डी (ता. दौंड) येथील 35 वर्षीय शेतकरी युवक गंभीर जखमी झाला असून, घटना घडून तीन दिवस झाले तरी महावितरणच्या दौंड कार्यालयातून अद्याप कुठलीही कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली नसल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांनी दिली.
हिंगणी बेर्डी येथील विठ्ठलनगर परिसराला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र मागील काही दिवसांपूर्वी जळाले होते. ते रोहित्र बदलण्याचे काम मंगळवारी (दि. 30) दुपारी चालू होते, त्यावेळी वायरमन एन. टी. होले आणि इतर दोन कर्मचारी उपस्थित होते. रोहित्र बदलण्याचे काम त्यांनी स्वतः न करता या कामासाठी रामदास बबन ढवळे (वय 35, रा. हिंगीणी बेर्डी, ता. दौंड) या युवकाला विजेच्या खांबावर चढवले. यावेळी अचानक मुख्य वाहिनीला विद्युत प्रवाह आल्यामुळे रामदास ढवळे याला विजेचा धक्का बसला आणि तो खांबावरून खाली कोसळला. झालेल्या अपघातात रामदास हा गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही हात निकामी झाले आहेत, किडनी व लिव्हर काम देत नसून, पाठीच्या मणक्‍याला व कमरेच्या हाडाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. जखमी रामदासला पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
विद्युत रोहित्र बदलण्याचे काम घेतलेल्या आखाडे एजन्सीच्या लोकांनी आणि वायरमन होले यांनी स्वतः न करता रामदास ढवळे या युवकास खांबावरती चढवल्यामुळेच झाला आहे. हे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह कसा आला, त्यासाठी आवश्‍यक तो परवाना होले यांनी घेतला होता का, वायरमन होले यांना विद्युत रोहित्र बदलायचे होते तर त्यांनी संबंधित एजन्सीचे लोक कमला का लावले नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वायरमन एन. टी. होले हे यापूर्वीही अशाच प्रकारे कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबित होते.

  • या घटनेची खबर विद्युत निरीक्षकांना दिलेली आहे. अशा घटनांचा तपास करण्याचा अधिकार त्यांनाच असून, अद्याप त्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली नाही. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
    मिलिंद डोंबाळे, उपकार्यकरी अभियंता, दौंड विभाग
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)