विजय माल्ल्या लंडनमध्ये करणार तिसरे लग्न ?

नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरे लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

विजय माल्ल्यावर बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. हे कर्ज वसुल करण्यासाठी अंमलबजावणी संचलनालयाने प्रक्रिया सुरु केली आहे. ईडीची ही कारवाई क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन ८३ अंतर्गत करण्यात येत आहे. ईडीने न्यायालयात विजय माल्ल्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, माल्ल्याने १९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या फॉर्म्युला वन रेसिंग दरम्यान ब्रिटिश फर्मला जवळपास १ कोटी २९ लाख रुपये दिले होते.

विजय माल्ल्याने हा पैसा आपली कंपनी किंगफिशरमधील कर्मचाऱ्यांना युरोप फिरवण्यासाठी दिले होते. हा पैसा आरभीआयकडून परवानगी न घेता देण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी अथॉरिटीचे उल्लंघन मानले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)