विजय मल्ल्या, ललित मोदीच्या प्रत्यार्पणात सहकार्य करावे

भारताची ब्रिटनला विनंती
नवी दिल्ली – मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदी यांच्या लवकरात लवकर प्रत्यार्पणासाठी भारताने आज ब्रिटनला सहकार्य करण्याची विनंती केली. हिरे व्यापारी नीरव मोदी याचा ठावठिकाणा समजण्यासाठीही मदत करण्याचे साकडे त्या देशाला घालण्यात आले आहे.

भारत आणि ब्रिटनमध्ये येथे तिसरी गृह विभागाविषयक चर्चा झाली. या चर्चेत मल्ल्या, ललित आणि नीरव मोदी यांचे मुद्दे उपस्थित झाले. क्रिकेट बुकी संजीव कपूर याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताने ब्रिटनकडे सहकार्य मागितले. काश्‍मिरी आणि खलिस्तानी विभाजनवाद्यांच्या भारतविरोधी कारवायांसाठी ब्रिटीश भूमीचा वापर करू दिला जाऊ नये, अशी अपेक्षा केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने चर्चेवेळी व्यक्त केली.

ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या भारतातील फरार आणि आर्थिक प्रकरणांमधील गुन्हेगारांबाबत दोन्ही बाजूंमध्ये सविस्तर चर्चा झाली. सायबर सुरक्षा, महिलांची सुरक्षा, दहशतवादासाठी पुरवला जाणारा निधी, गुप्तचरविषयक माहितीची वेळीच आदान-प्रदान, भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी व्हिसा आदी मुद्‌द्‌यांवरही भारत आणि ब्रिटनच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)