विजय मल्ल्या म्हणतो ‘लोकांचे पैसे शंभर टक्के परत करण्यास तयार’

2016 मध्येच मी बॅंकांना सेटलमेंटची ऑफर दिली होती

नवी दिल्ली: आपल्याला ब्रिटनहून मायदेशी परत पाठवून देण्याच्या प्रकरणात कायदेशीर सुनावणी जी काहीं व्हायची असेल ती होवो पण लोकांचे पैसे परत करण्याचा आपला शंभर टक्के निर्धार आहे असे लंडनमध्ये पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने म्हटले आहे. मी बॅंकांना त्यांची मूळ रक्कम परत करण्यास अजूनही तयार आहे बॅंकांनी ती स्वीकारावी अशी विनवणीही त्याने या ट्‌विटर संदेशात केली आहे. राजकारणी आणि माध्यमांनी आपल्याला भगोडा असे संबोधले आहे पण आपण पैसे बुडवून पळालेलो नाही असेही त्याने म्हटले आहे. त्याने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

सध्या ब्रिटनमध्ये भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा लवकर निकाल लागावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही केस मी माझ्या पद्धतीने लढत आहे, त्याचा जो काहीं निर्णय व्हायचा आहे तो होईल पण आपण लोकांचे पैसे निश्‍चीत परत करणार आहोत असे त्याने यात नमूद केले आहे.

मल्ल्या प्रकरणात येत्या 10 डिसेंबर रोजी न्यायालयाचा निर्णय येईल असे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्याने केलेल्या विधानाला महत्व आहे. मी बॅंका आणि सरकारला हे पैसे परत करण्यास तयार आहे त्यांनी ते स्वीकारावेत असे त्याने म्हटले आहे. माझी ही ऑफर का नाकारली जात आहे असा उलट सवाल त्यानेच केला आहे. भारतीय बॅंकांचे सुमारे नऊ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडवून मल्ल्या सन 2016 मध्ये लंडनला पळाला आहे. त्याने म्हटले आहे की मी कर्नाटक हायकोर्टात कर्ज रकमेच्या सेटलमेंटची ऑफर दिली होती पण त्याकडे दुर्लक्ष करून भारतातील राजकारण्यांनी आणि माध्यमांनी मी कर्ज बुडवून पळवून गेलो आहे असा खोटाच प्रचार वारंवार केला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.

सन 2016 पासून माझ्या पैशाच्या बाबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न बॅंकांशी बोलून केला आहे. पण त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही असे त्याचे म्हणणे आहे. आपल्या मोडीत निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या संबंधात बोलताना त्याने म्हटले आहे की विमानाच्या इंधनाच्या प्रचंड दरामुळेच आपली एअरलाईन्स डबघाईला आली. बॅंकांकडून घेतलेले सारे पैसे या विमानांच्या इंधनातच गेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)