नवी दिल्ली: कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने देश सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केल्याचा दावा केला आहे. आता या मुद्यावरून विरोधी पक्षांनी अरुण जेटली यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अरुण जेटलींवर हल्ला चढविला.

दरम्यान, भारतातून फरार झालेल्या ललित मोदींनी यामध्ये उडी घेतली आहे. ललित मोदी यांनी जेटली यांची तुलना सापाशी करत जेटलींना खोटं बोलण्याची सवय असल्याचे म्हटले आहे. विजय मल्ल्याने देश सोडण्यापूर्वी अरूण जेटलींची भेट घेतल्याचे खरे आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

विजय मल्ल्या अरूण जेटलींना भेटला होता हे तिथे असलेल्यांना माहित आहे. तरीही जेटलींनी मल्ल्यांची भेट घेतल्याचे वृत्त का फेटाळले जाते आहे? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विजय मल्ल्यासोबत अरूण जेटलींनाही टॅग केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)