विजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा !

छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील विजयानंतर काॅंग्रेसवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर देखील काॅंग्रेला भरभरून शुभेच्छा मिळत आहे.  ट्विटरवर आलेले अभिनंदनाचे एक ट्विट चर्चेच विषय ठरला आहे.

9 हजार कोटींचा गंडा घालून परदेशी फरार झालेल्या विजय मल्ल्या यांनी ट्विट करत काॅंग्रेस नेते सचिन पायलट आणि ज्योतीरादित्य शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजय मल्ल्याने ट्विटमध्ये लिहिले की, यंग चॅंम्पियन सचिन पायलट आणि ज्योतीरादित्य शिंदे यांना खुप शुभेच्छा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजय मल्ल्या यांचे हे ट्विट चांगलेच वायरल झाले.

विजय मल्ल्याच्या या ट्विटवर अनेक कमेंट आल्या आहेत. काहीनी लिहिले की, काॅंग्रेसच्या विजयानंतर विजय मल्ल्याचे अच्चे दिन आले आहेत.

तसेच नुकतेच लंडन येथील न्यायालयाने मल्ल्याने केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्याला भारताकडे हस्तांतरित करावे, या भारतीय तपास यंत्रणांच्या मागणीवर शिक्कामोर्तब केले. ६२ वर्षीय विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे ९००० करोड बुडवल्याचा आरोप असून त्याने २०१६ मध्ये भारतातून ब्रिटन येथे पलायन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)