विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ 

मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार
 
नवी दिल्ली – फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला कोणताही ही दिलासा मिळू शकलेला नाही. न्यायालयाने मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तर विजय मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात न्यायालयाने केंद्राचे मत मागवले आहेत.

भारतीय बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्या परदेशात फरार झाला आहे. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीला मल्ल्याची भारतातील मालमत्ता जप्त करायची असून फरारी घोषित केल्याशिवाय त्याची मालमत्ता जप्त करता येणार नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात ईडीने अर्ज केला आहे. यात विजय मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

-Ads-

या प्रकरणी विजय मल्ल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मल्ल्याच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मल्ल्याविरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तर फरारी घोषित करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे मत मागवले आहे. दरम्यान, परदेशात फरार झालेल्या मल्ल्याची भारतातील संपत्ती विकून बॅंकांनी आतापर्यंत 963 कोटी रुपयांची वसुली केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)