विजय पराजय कोणाचाही होऊ दे,मात्र राष्ट्रपती ‘आमचाच’

बसपा सुप्रीमो मायावतींचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीबाबत बसपा सुप्रीमो मायावतींनी मोठे वक्तव्य केले आहे. मायावती यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत विजय पराजय कोणाचाही होऊ दे, परंतु राष्ट्रपती दलितच होणार…

बसपा सुप्रीमो मायावतींनी म्हटले आहे की, पहिल्यांदाच सत्ताधारी व विरोधकांकडून दलित उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत हार जीत कोणाचीही होऊ दे राष्ट्रपती दलित व्यक्तीच असेल. मायावतींनी म्हटले की, ही बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे.

विरोधकांकडून मीरा कुमार यांचे नाव पुढे आल्यानंतर मायावती यांनी मीराकुमार यांना समर्थन देण्याची घोषणा केली होती. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना मैदानात उतरवल्यानंतर मायावतींनी म्हटले होते की, जर विरोधकांनी मजबूत दलित उमेदवार दिला नाही तर बसप रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देईल. मायावती यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना वरील विधान केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)