‘विजय दिवस’ समारोहास आज प्रारंभ

कराड, दि. 13 (प्रतिनिधी) – बांगला मुक्ती संग्रामातील भारतीय सैन्यदलाच्या दैदिप्यमान विजयाच्या प्रित्यर्थ कराडला विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या कल्पकतेमधून 14 ते 16 डिसेंबर रोजी होणारा विजय दिवस सोहळ्याने आजही आपले वेगळेपण जपले आहे. यंदाच्या या सोहळ्यास आज (शुक्रवारी) दिमाखात प्रारंभ होत आहे.
विजय दिवस समारोहाचे यंदाचे 21 वे वर्ष आहे. मराठा लाईट इंन्फट्रीला यंदा 250 वर्षे होत असल्याने यंदाचा विजय दिवस मराठा लाईट इंन्फट्रीला समर्पित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सैन्य दलाच्या कसरतीसह मोटरसायकलच्या डेअरडेव्हील्सचे खास आकर्षण असणार आहे. विजय दिवस समारोह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सैन्यदलाचे जवान, शस्त्रास्त्रे तसेच मराठा बटालियनचे जवान कराडमध्ये दाखल झाले आहेत.
यंदाच्या विजय दिवस समारोहात शोभा यात्रा, कराड स्वच्छता दौड, माजी सैनिकांचा मेळावा, यशवंत जीवन गौरव पुरस्कार वितरण मान्यवरांचे उपस्थितीत होणार आहे. सोहळ्याच्या मुख्य दिवशी दि. 16 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर सैन्य दलाच्या कसरतीं व प्रात्यक्षिके होणार आहे. यंदा सैन्यदलातील जवानांचे डेअरडेव्हील्सचे पथक हे आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर सैन्यदलाचे श्वान पथक, एसआरपीएफचे पीटीची प्रात्यक्षिक, गुरखा रेजिमेंटचा कुकरी डान्स, बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपचे जिम्नॅशीयमचे प्रात्यक्षिक, पुणे येथील पॉवर मोटर ग्रुप, मराठा लाईट इंन्फंट्रीचे लेझीम व मल्लखांबचे पथक आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे समुह नृत्य पाहण्याचाही नागरिकांना आनंद मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)