विजय तेंडुलकरांचे योगदान महत्त्वाचे – निहलानी

पिफ फोरचे उद्‌घाटन : “पिफ डिस्टिंग्विश्‍ड पुरस्काराचे’ वितरण

पुणे – कलात्मक लिखाणात लेखकाची स्वतःची विचारप्रक्रिया फार महत्त्वाची असते आणि ती कोणी तुम्हाला शिकवू शकत नाही. तुमच्याकडे ती असावी लागते. ज्येष्ठ लेखक आणि नाटककार विजय तेंडुलकरांचा माझा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होण्यात मोठा वाटा आहे. त्यांच्या कामात सखोलता होती. त्यांचे भारतीय चित्रपटांसाठी योगदानही आहे. परंतु, माझ्या मते त्यांना त्यासाठी अपेक्षित ती ओळख मिळाली नाही, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत “पिफ फोरम’चे उद्‌घाटन निहलानी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, सचिव रवी गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी निहलानी यांना 17 व्या महोत्सवाचा “पिफ डिस्टिंग्विश्‍ड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

निहलानी म्हणाले की, आता सर्व गोष्टी डिजिटल आहेत. काम अधिकाधिक चांगले होण्यासाठी असलेले तंत्रज्ञान आपण स्वीकारले पाहिजे. सध्या उपलब्ध असलेले तंत्रज्ञान उत्तम असून त्यामुळे प्रतिभानिर्मितीचे नवे आयाम खुले झाले आहेत. “गांधी’ चित्रपटाबद्दल अनुभव सांगताना निहलानी म्हणाले, रिचर्ड ऍटनबरो यांच्या गांधी चित्रपटासाठी “सेकंड युनिट’ दिग्दर्शक म्हणून माझी निवड होईल, असे मला वाटले नव्हते. या चित्रपटामध्ये काम करताना मला व्यवस्थापनाचे धडे शिकायला मिळाले. महात्मा गांधींचे आयुष्य तीन तासांमध्ये बसवणे सोपे नसल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने याची पटकथा वाचायला हवी.

दिग्गजांच्या स्मृतींना उजाळा
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित “पिफ फोरम’च्या प्रवेशद्वारास दिग्गजांची नावे देण्यात आली आहेत. यावर्षी जन्मशताब्दी असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके आणि ज्येष्ठ कवी, गीतकार ग. दि. माडगुळकर यांचे नाव प्रवेशद्वाराला दिले आहे. त्याचबरोबर फोरमच्या मुख्य व्यासपीठास ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले आहे. याचबरोबर ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात येणार आहे.

आपली भूमिका विकसित करणे महत्त्वाचे 
माझे या ठिकाणी असण्याचे श्रेय मी “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ ला जाते. तेव्हा मी तांत्रिक गोष्टीसुद्धा शिकले. त्यामुळे मला काम करताना गरजेची दृष्टी मिळाली. आपली भूमिका समजून घेत ती विकसित करणे महत्त्वाचे असते हे मला तेव्हा समजले, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्‍त केली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)