विजय चौधरी प्रोबेशनरी उपअधिक्षकपदी रूजू

 

पुणे : प्रतिनिधी
महाराष्टल केसरी हा किताब तीन वेळा पटकाविणारे कुस्तीपटू विजय चौधरी हे पुणे ग्रामीण दलात प्रोबेशनरी पोलीस उपअधिक्षक पदाचे प्रशिक्षण घेणार आहेत.

राज्यसरकारने कुस्तीपटू विजय चौधरी यांची पोलीस उपअधिक्षक (डीवायएसपी) पदावर नियुक्ती केली आहे. नाशिक येथील पोलीस ऍकाडमी येथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ते पुणे ग्रामीण दलामध्ये एक वर्षाचे प्रोबेशनरी पोलीस उपअधिक्षक या पदाचे प्रशिक्षण घेणार आहेत. दरम्यान चौधरी यांनी मंगळवारी दि. सप्टेबर रोजी पाषाण रोडवरील कार्यालयात आले आणि त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांची भेट घेतली. पोलीस अधिक्षक कार्यालय, तसेच ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यात कसे कामकाज केले जाते याची माहिती त्यांनी समजून घेतली. यासोबतच पोलीस दलात प्रशिक्षण सुरू असताना ते पुण्यात कुस्तीचा सराव करण्यावरही विशेष भर देणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)