मंचर-विद्यार्थ्यांनी खेळ खेळताना आत्मविश्वास जागरुक ठेवून खेळ खेळल्यास यश निश्चित मिळते; परंतु मनात नैराश्याची भावना येता कामा नये. त्यामुळे विजयाजवळ आलेला विद्यार्थी पराभवाच्या गर्तेत सापडतो. त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. असे मत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वितरण कार्यक्रम झाला. माजी उपसरपंच संदीप थोरात यांच्या सौजन्याने 26 विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांचे क्रीडा गणवेश भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक उत्तम थोरात होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब थोरात, मुख्याध्यापक काशिनाथ बांबळे, सागर थोरात, शरद खेडकर, सुदाम थोरात, महेंद्र थोरात, सीताराम टेमगिरे, प्रमोद थोरात, संतोष काळे, समीर थोरात, निलेश थोरात, संजय थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सतीश वाव्हळ, दीपाली अजाब, दत्ता गोरडे, रुपाली लाळगे, सुनिता धिमते, नंदिनी पडवळ या शिक्षकांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक रोहिदास सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन अक्षय खरमाळे यांनी केले. बाळासाहेब कानडे यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा