विजयासह जुवेंटसचा नवीन विक्रम !

मिलान: ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे जुवेंटसने साम्पडोरिया संघाचा 2-1 असा पराभव करत वर्षातील अखेरचा सामना जिंकला. त्याचबरोबर त्यांनी एका पर्वात हिवाळी सुटटीच्या अगोदर सिरीज ए (इटालियन लीग)मध्ये सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम दखील प्रस्थापित केला आहे. त्याने या मोसादमात 19 सामन्यात एकही सामना ना गमावता 53 गुण मिळवले असून अव्वल स्थान गाठले आहे.

सिरीज ए मध्ये अन्य सामन्यात नापोली संघाने बोलोग्ना संघाचा 3-2 असा पराभव एकला. या सामन्यात डी. मार्टेन्सने निर्णायक गाल करत नापोलीला विजय मिळवून दिला. मागील सामन्यात त्याला वर्णद्वेषी घोषणांचा सामना करावा लागलेल्या नापोलीचा बचावपटू केलिडॉ कॉलीबेलीला या सामन्यात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आज त्याला बंदी असूनही क्‍लबचे पाठीराखे त्याचे पोस्टर घेऊन मैदानात आले आणि “आम्ही सर्व कॉलीबेली’ म्हणत वर्णद्वेषाचा तिरस्कार केला. गुणतक्त्‌यात नापोली दुसऱ्या स्थानावर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)