विजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन 

भावीनिमगाव – न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून महावितरणणे जायकवाडी उपसासिंचन योजनेचा विज पुरवठा वेळ निम्याने कमी केली आहे.केवळ 4 तास विज पुरवठा होत असल्याने शेतीतील पिकांना पाणी देणे शक्‍य होत नसल्याने पिके धोक्‍यात येणार असुन दुष्काळात थोडेफार तरी पिक हाती येणार असल्याच्या शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. याची खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणे 8 तास विज पुरवठा सुरळीत करावा अशा मागणीचे निवेदन शेवगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांना लेखी स्वरूपात देण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाई लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, मात्र उद्योग व्यवसायास हा नियम लागु न करता फक्त शेतकऱ्यांना नियम लागु केल्याने शेती पीके धोक्‍यात येणार आहेत. या निवेदनावर इरफान काझी, अशोक मेरड, मनोज मोरे, संजय पवार, राम पवार, मोहन म्हस्के, कृष्णा ढवळे, विनोद पवार, अण्णासाहेब बामदळे, सतीष पवार, बाबासाहेब गरड,दत्ता माळवदे, तालुकाध्यक्ष संदिप बामदळे आदिंच्या सह्या आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)