विजजोडणी मिळाल्यानं गारोळेपठारत महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली

संगमनेर – सुमारे दोन वर्षापासून वीजजोडणी अभावी वस्तीतील पाण्याच्या टाकीत पाणी येऊ न शकल्याने  गारोळे पठारच्या महिलांची पाण्यासाठी पायपिट होत होती. मात्र आता वीजजोडणी मिळाल्यानं ही पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. संगमनेर तालुक्यातील गारोळे पठार या ठाकर वस्तीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी  होणारी दैनंदिन परवड ही ग्रामीण भागा बाबत सरकारची अनास्था दर्शविणारी आहे. माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दररोज त्यांना  अडीच किलोमीटर खोल डोंगर दरीतून प्रवास करावा लागत असे  मात्र आता शनिवारी विजोडणी मिळाल्यानं त्यांची ही वणवण थांबली.

गारोळे पठार ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकड़े पाण्याची सोय व्हावी म्हणून अनेकदा पाठपुरावा केला, मात्र सर्वांनीच त्यांची निराशा केली. अखेर संगमनेर मधील मालपाणी उद्योग समुहाने २०१७ मध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चार ते पाच लाख रूपये खर्चून, विहिर ते वस्ती अशी अडीच किलोमीटर्सची पाइप लाइन टाकली, तसेच विहीरीवर पाणी उपसण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरही बसवून दिली. मात्र मागणी प्रमाणे मंजूरी असूनही विज वितरण कंपनीने विहीरीवर विज जोड दिला नाही. एकीकडे शहरी भागातील नागरिकांसाठी स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वे, समृद्धि महामार्ग अशा योजना पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या सरकारने आमच्या कडेही थोडे लक्ष द्यावे, अशी रास्त अपेक्षा गारोळे पठारच्या महिलांची होती. शहरीभागांना रस्ते-विज-पाणी पोटतिडकीने पुरवण्या बरोबरच वायफाय, मेट्रो आदीसह ग्रामीण जनतेचा विरोध डावलुन राज्य सरकार समृद्धि महामार्गासाठी आग्रही आहे. दूसरीकड़े गारोळे पठार सारख्या अनेक गावे आणि वाड़ी- वस्तीवर पाणी, विज आदि प्राथमिक सोयींची वानवा या ग्रामीण भारताच्या वास्तवाकड़े  सरकार डोळेझाक तर करत नाही ना, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

जिल्हा  परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांच्या लक्षात ही बाब जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या काळात आली, या कामाचा पाठपुरावा करण्याचे त्यांनी या बाबत स्थानिकांना आश्वासन हि दिले होते. त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गरोळे पठार महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली घ्यायचा निश्चय केला. आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आज गारोळे पठार येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून नऊ पोल टाकून थ्रीफेज लाईन तातडीने जोडण्यात आली, तसेच गरोळे पठार येथील पाण्याचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, पंचायत सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, सरपंच संदीप सांगळे, उपसरपंच बशीर चौगुले,संतोष शेळके, विकास शेळके, सुहास वाळूंज, संदेश गाडेकर, प्रियांका गडगे, पप्पू चौगुले, अरुण कुरकुटे, गणपत कुऱ्हाडे, श्रीकृष्ण मेंगाळ, संदीप आभाळे, सुरेश वाघ, बाळू शेळके, नवनाथ आहेर, अशोक गाडेकर, जनसेवक बबन खेमनर आदि सह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)