विचित्र अपघातामुळे एक्‍सप्रेस वे वर वाहतुकीचा खोळंबा

  • चालकाचा मृत्यू : अमृतांजन पुलाजवळ दुधाचा टॅंकर उलटला

लोणावळा – पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळ भरधाव वेगातील दुधाचा टॅंकर उलटून झालेल्या भीषण अपघातात टॅंकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातानंतर काही मिनिटांत याच ठिकाणी आठ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

आदिल (पूर्ण नाव व पत्ता समजू शकले नाही) असे अपघातात मृत्यू झालेल्या टॅंकर चालकाचे नाव आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोईमतूर (तामिळनाडू) येथून नवी मुंबई येथे दूध घेऊन जाणाऱ्या टॅंकर (के.ए.3696) चालकाचे येथील तीव्र उतार व वळणामुळे टॅंकरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टॅंकर मार्गावरील पुलाच्या सिमेंटच्या मोठ्या खांबावर जोरात आदळली. यामध्ये टॅंकरच्या केबिनचा चक्‍काचूर झाला. या घटनेत टॅंकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. आदिल हा अपघातात मृत्यू झालेल्या टॅंकर चालकाचे नाव आहे.

-Ads-

दरम्यान, अपघातामुळे मुंबईकडे जाणारी एक लेन वाहतुकीसाठी बंद झाली होती. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस व खंडाळा महामार्गाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी करीत अपघातग्रस्त टॅंकरमधील केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला महामार्गावरील देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने टॅंकर बाजूला करीत मुंबईकडे जाणारी वाहतूक एका बाजूने सुरू केली.

पोलीस वाहतूक नियंत्रण करीत असताना काही मिनिटांतच पुन्हा याचठिकाणी आठ वाहने एकमेकांवर आढळून विचित्र अपघात झाला. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये तीन मोटारी, एक पिकअप जीप, एक कंटेनर, तीन ट्रेलर यांचा समावेश होता. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी सर्व अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरून हटविल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तासाने सुरळीत झाली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)