विचारसरणी महत्वाची असल्यानेच पवार यांची कॉंग्रेसशी हातमिळवणी 

File photo

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोदींना उत्तर

मुंबई –भाजपने वीस वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उपपंतप्रधान बनवण्याची ऑफर दिली. मात्र, व्यक्तिगत मुद्‌द्‌यांपेक्षा विचारसरणी महत्वाची असल्याने पवार यांनी त्यावेळी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली, अशा शब्दांत राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिले.

मोदींनी बुधवारी बारामतीसह महाराष्ट्राच्या काही लोकसभा मतदारसंघांमधील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पवार यांच्यावर वेळोवेळी अन्याय झाल्याने त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्याचे म्हटले. कॉंग्रेसकडून अपमान होत असूनही पवार पुन्हा त्याच पक्षाच्या दारात जात असल्याची खंत वाटते, अशी टिप्पणीही मोदींनी केली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात 1999 मध्ये एकत्रितपणे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपने पवार यांना उपप्रंधान बनवण्याचा प्रस्ताव दिला. राज्यात एकत्रित सरकार स्थापण्याचा प्रस्तावही त्यावेळी भाजपकडून देण्यात आला. मात्र, राज्यात कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. त्यांच्यासाठी व्यक्तिगत अहंकार नव्हे तर विचारसरणी महत्वाची आहे. जे काही घडले त्याला 20 वर्षे झाली आहेत. त्यासाठी भाजप आता का अस्वस्थ आहे, असा सवाल मलिक यांनी विचारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवार यांनी कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परकी वंशाच्या मुद्‌द्‌यावरून 1999 मध्ये त्या पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. दरम्यान, मोदींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देण्यात आली असली तरी स्वत: पवार त्याविषयी काय बोलणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)