विचारवतांवर हल्ले करणाऱ्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करा- आ. थोरात

अंनिसतर्फे संगमनेरामध्ये जवाब दो आंदोलन
संगमनेर – विचारवतांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने शासनाला दिले. डॉ.दाभोळकर, कॉ. पानसरे यांच्या सारख्या समाजासाठी निस्वार्थीपणाने काम करणाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या मुख्य सुत्रधारांच्या शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनातील दिरंगाईबाबत केंद्र व राज्य सरकारच्या असंवैधानिक वर्तनाबाबत जवाब दो आंदोलन अंनिसतर्फे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ऍड.रंजना गवांदे, प्रा.बाबा खरात, हिरालाल पगडाल, अशोक गवांदे, अब्दुला चौधरी, संग्राम जोंधळे, अरविंद गाडेकर, समिर लामखडे, ऍड.ज्योती मालपाणी, अनुराधा आहेर आदि उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जवाब दो रॅली काढण्यात आली.
आ. थोरात म्हणाले, स्वामी अग्निवेश सारख्या ज्येष्ठ व्यक्‍तीवर दिल्ली व हरीयाणा या ठिकाणी हल्ले होतात.याची दखल घेतली नाही. देशात व राज्यात विचारवंतावर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे विचार संपणार नाही. अंनिसचे काम करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. या घटनेला अनेक वर्ष लोटले असून मुख्य सुत्रधारांवर अद्याप कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. झुंडशाही थांबविणे ही शासनाची जबाबदारी असून हल्लेखोरांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ऍड. गवांदे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तींच्या जिवेतेचे व मालमत्तेचे रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. परंतू आज देशात व राज्यात वेगळे चित्र दिसत असून विचारवंतांचे खून होत आहेत. मारेकरी व सुत्रधारांपर्यंत पोहचण्यास पाच वर्षाचा कालावधी जातो. भिमा कोरेगाव सारख्या दंगली, साधकांच्या घरात सापडणारे बॉम्ब, शस्त्रसाठा यातून समाजात असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात अंनिसच्या माध्यमातून जवाब दो आंदोलन सुरु आहे. यावेळी डॉ.आ. तांबे, दुर्गा तांबे, हिरालाल पगडाल, अब्दुला चौधरी, संग्राम जोंधळे आदिंनी मनोगत व्यक्‍त केले. या आंदोलनात संदीप शेळके, प्रशांत पानसरे, अनिकेत घुले, देवारे, किरण खैरनार, रघुनाथ वाघ, असिफ शेख यांच्यासह अंनिसचे असंख्य कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)