विघ्नहर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

ओझर- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय, ओझरचा शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट परीक्षा 2018 चा निकाल वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार शंभर टक्के असून, 29 विद्यार्थ्यांनी “अ’ श्रेणी प्राप्त केली असल्याची माहिती मुख्याध्यापक विलास दांगट यांनी दिली. या विद्यालयातील एलिमेंटरी परीक्षेसाठी 52 विद्यार्थी, तर इंटरमिजिएट परीक्षासाठी 35 विद्यार्थी असे एकूण 87 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत अनुक्रमे 25 व 4 असे एकूण 29 विद्यार्थ्यांनी “अ’ श्रेणी प्राप्त करीत विद्यालयाच्या मागील निकालांचा विक्रम मोडीत नवा उच्चांक व तालुक्‍यातील सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. “ब’ श्रेणी 27, तर “क’ श्रेणी 31 विद्यार्थ्यांनी प्राप्त केली असून, या सर्व विद्यार्थ्यांना कलाध्यापक संतोष सगर यांनी मार्गदर्शन केले आहे. या विद्यालयाचा कला व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असून, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाकडून कला व क्रीडा परीक्षेचे गुण मिळू लागल्याने या परीक्षांना महत्त्व प्राप्त झाले असल्याचे क्रीडा शिक्षक गणेश राऊत यांनी सांगितले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक कलाध्यापक संतोष सगर यांचे विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, सरपंच, उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ ओझर या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)