स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’, ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘छोटी मालकीण’ मालिकेचा महासंगम एपिसोड

आपल्या सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या लाडक्या दैवताची आपण वर्षभर आतुरतेने वाट पहात असतो. ‘ललित २०५’ या मालिकेतलं राजाध्यक्ष कुटुंबही गेले कित्येक वर्ष बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलंय. यंदा मात्र त्यांची ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. धाकटी सून भैरवी राजाध्यक्षांची ही इच्छा पूर्ण करणार आहे.

भैरवीच्या पुढाकारामुळेच यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन होणार आहे. राजाध्यक्षांच्या या आनंदात ‘छोटी मालकीण’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेचे कलाकारही सहभागी होणार आहेत. सणाच्या निमित्ताने का होईना आपापसातले हेवेदावे विसरुन राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आलंय, मनात मात्र कटुता कायम आहे. बाप्पाच्या येण्याचा आनंद जरी असला तरी भैरवीमुळे हा आनंद घरात आलाय ही गोष्ट नीलिमा आणि गार्गीला खटकतेय. त्यामुळे भैरवीच्या आनंदात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न या दोघी करणार आहेत. आता नीलिमा आणि गार्गीचा हा प्लॅन यशस्वी होतोय का?  भैरवी बाप्पाची पूजा निर्विघ्नपणे पार पाडणार का? छोटी मालकीण आणि लेक माझी लाडकीमधले कलाकार या सणाचा आनंद कसा द्विगुणीत करणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं गणपती विशेष भागात मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)