विघ्नहराच्या भाविकांची पहाटेपासून गर्दी

ओझर- संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे 5 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त देविदास कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, ज्ञानेश्वर कवडे, शंकर कवडे, अनिल मांडे, बबन मांडे आणि ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी विधिवत अभिषेक केला. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सकाळी 7 व दुपारी 12 वाजता आरती करण्यात आली. सकाळी 8 वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात करण्यात आले. भाविकांच्या सुविधासाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, चप्पल स्टॅंड, पार्किंग आदी सुविधा पुरवण्यात आल्या. सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत ह. भ. प. माऊली महाराज दुराफे (कुसूर) यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना रामप्रसादिक भजन मंडळ (शिरोली खुर्द) यांनी साथ संगत दिली. सर्व वारकऱ्यांना अन्नदान भालचंद्र रवळे यांनी केले. पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले. रात्री 10.30 वाजता शेजाआरती करून 11.00 वाजता मंदिर बंद करण्यात आले. संकष्ट चतुर्थीनिमित्त ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, टी. डी. दाते, के. एम. पाटोळे, माऊली शिंदे, जोतिबा पवार व अन्य कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)