विघ्नहराच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

ओझर- संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेले श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे 5 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे आणि ग्रामस्थ अविनाश जाधव याच्या हस्ते श्रींना अभिषेक करण्यात आला. मंदिराचे पुजारी हेरंब जोशी यांनी विधिवत पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळी 7 आणि दुपारी 12 वाजता आरती करण्यात आली. सकाळी 7 वाजता मंत्रपुष्पांजली आणि 8 वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10ः30 वाजता श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात देवस्थान ट्रस्टतर्फे विविध सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत हभप लक्ष्मण महाराज वायाळ (भोरवाडी ता. जुन्नर) यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजन मंडळ (शिरोली खुर्द) यांनी दिली. पहाटे 5 ते रात्रौ 11 पर्यंत अनेक मान्यवरांसह हजारो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले. रात्रौ 10ः30 वाजता शेजआरती करून 11 वाजता मंदिर बंद करण्यात आले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, कर्मचारी व ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, जोतिबा पवार, माऊली शिंदे व इतर कर्मचारी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)