विघ्नहर’चे उद्या गव्हाण पूजन

निवृत्तीनगर – जुन्नर तालुक्‍यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी 33 व्या गाळप हंगामाच्या गव्हाण पुजनाचा कार्यक्रम शनिवारी (दि. 13) होणार आहे, असे आवाहन विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
सत्यशिल शेरकर म्हणाले की, आगामी गाळप हंगामात कार्यक्षेत्रात सुमारे 12 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून त्यामध्ये आडसाली उसाचे प्रमाण जास्त आहे. एकंदरीत 16 हजार एकर आडसाली ऊस गाळपासाठी रहाणार असून विघ्नहर सर्व ऊसाचे गाळप वेळेवर पूर्ण करणार आहे. गाळप हंगामासाठीची मशिनरी देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली असून ऊस तोडणी लेबर कारखान्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी गाळप हंगामात अतिरीक्‍त ऊस गाळप, इंधनाचे वाढलेले दर, मार्केटमध्ये असलेली आर्थिक मंदी अशा अनेक अडीअडचणी, आव्हाने समोर असताना सर्व कारखाने यावर्षीचा गाळप हंगाम सुरू करणार आहोत. विघ्नहर कारखान्याने नेहमीच काटकसरीने कारखाना चालविलेला आहे. व यापुढील काळामध्येही चालविणार आहोत. विघ्नहरने आत्तापर्यंत अनेक मोठ्या राजकीय व्यक्‍ती, जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी, कितर्नकार महाराज अशा व्यक्‍तींच्या हस्ते मोळीचे कार्यक्रम केलेले आहेत;परंतु आजपर्यंत संचालक मंडळाचे हस्ते मोळीचा कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे शनिवारी (दि. 13) सर्व संचालक मंडळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पुजनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

  • शिल्लक साखरेचे करायाचे काय?
    यावर्षी देशामध्ये विक्रमी असे साखर उत्पादन होणार आहे. जवळपास 350 लाख मे.टन साखरेचे उत्पादन संपूर्ण देशामध्ये होणार आहे. देशांतर्गत साखरेचा खप व होणारे विक्रमी साखर उत्पादन यामुळे शिल्लक राहणाऱ्या साखरेचे करायचे काय ? हा मोठा प्रश्‍न साखर उद्योगापुढे उभा राहिलेला आहे, असे सत्यशिल शेरकर यांनी नमूद केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)