विखे फाउंडेशनतर्फे सर्वरोग निदान शिबिर

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील साकतमध्ये दि. 31 जानेवारी रोजी डॉ. विखे पाटील मेमोरियल फाउंडेशनतर्फे आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

साकत येथील सेवा सोसायटी येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी विखे हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्‍टर्स तपासणी करून मोफत उपचार करणार आहेत. शिबिरात आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. त्यापुढील उपचारासाठी 20 टक्‍के सवलत देणारे हेल्थ कार्डही देण्यात येईल. यावेळी मोतीबिंदू तपासणी, हिमोग्लोबीन, मधुमेह तपासणी, हृदयरोग तपासणी, ई.सी.जी, एक्‍स-रे, कोलेस्टेरॉल, बालरोग तपासणी, व्यसनमुक्ती समुपदेशन उपचार-मार्गदर्शन, स्त्रीरोग, मानसिक आजार, एचआयव्ही तपासणी, दंतरोग चिकित्सा, मणक्‍यांचे आजार, हाडांचे विकार, आदी आजारांबाबत मोफत तपासणी करण्यात येईल. हृदय, मेंदू, छातीचे विकार तसेच शरीरावरील गाठी, गोळे, पित्ताशयाचे खडे, मूत्रविकार यावर उपचार केले जातील. नेत्र चिकित्सेत मोतीबिंदू, काचबिंदू, लासूर, रांजनवडी यावर उपचार केले जातील. स्त्रीरोगातील गर्भपिशवीचे आजार, गर्भाशयाच्या गाठी, पाळीचा त्रास, बालरोगाचे सर्व आजार तसेच हाड मोडणे, संधिवात, सांधे तपासणी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)