विखे-पाटलांनी बिनशर्त माफी मागावी – देवेंद्र फडणवीस

अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा दिला इशारा

मुंबई – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईतील बड्या बिल्डर्सना फायदा मिळवून देण्यासाठी विकास आराखड्यात मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांच्या मदतीने बदल केल्याचा गंभीर आरोप विखे-पाटलांनी केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना विकास आराखडा म्हणजे काय, हे तरी समजतं का, असा प्रश्न पडावा, असे अत्यंत बिनबुडाचे आरोप त्यांनी केले आहेत. त्यांनी केलेले आरोप एकतर सिद्ध करावेत, अथवा बिनशर्त माफी मागावी. असे न केल्यास त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईच्या विकास आराखड्यातील अनेक आरक्षण बेकायदेशीरपणे बदलण्यात आली. मुंबईतील मोठ्या बिल्डरांना फायदा पोहचवण्यासाठी ही आरक्षण बदलण्यात आली. त्यामुळे दहा हजार कोटी रुपयांचे कमिशन मुख्यमंत्री कार्यालयाला मिळणार आहे. त्यातील पाच हजार कोटींचा पहिला हफ्ता देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच 15 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्र्यांना वेळ देतो, हे आरक्षण रद्द करावे, नाहीतर कोर्टात जनहित याचिका दाखल करु आणि सेबी बिल्डर विरोधात तक्रार करु, असा इशाराही विखे-पाटलांनी दिला होता.

विखे-पाटील यांनी केलेले आरोप अतिशय हास्यास्पद आहे. मूळ आराखडा तयार करतानाचे बदल, त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर झालेले बदल आणि त्यानंतर शासनाने केलेले बदल यातील अंतर त्यांनी समजावून सांगितले. शासन स्तरावर केवळ 14 बदल प्रस्तावित झाले, हे वास्तव आहे आणि हे 14 बदल सुद्धा अद्याप अंतिम करण्यात आलेले नाहीत. जे 2500 बदल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सूचविले, त्यावर सुद्धा हरकती/सूचना मागविण्यात आल्या होत्या, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)