विक्री वाढल्याने शेअर निर्देशांकांत मोठी घट बॅंकांचे एनपीए आणि जागतिक बाजारात क्रुडचे दर वाढल्याचा परिणाम 

File photo

अमेरिकेने इराणमधून पाठविले जाणारे तेल रोखण्याचे ठरविले आहे. त्यामुळे क्रुडच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर रुपया एकतर्फी घसरून दीड वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. या कारणामुळे शेअरबाजारात सकाळपासून विक्रीचे वातावरण होते. विशेषत: तेल शुद्धीकरण करणाऱ्या कंपन्यांचे शेअर घसरले.
मुंबई, दि.27-क्रुडचे वाढलेले दर आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या एकतर्फी विक्रीमुळे रुपयाचे मूल्य आज दीड वर्षाच्या नीचांकावर गेले. त्याचबरोबर बॅंकांचे अनुत्पादक कर्ज वाढणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने काल सांगितले असल्यामुळे शेअरबाजारात बुधवारी सकाळपासून  विक्री झाली व निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. अमेरिकेने इराणकइून होणाऱ्या तेलाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर क्रुडचे दर 76 डॉलर प्रति पिंप झाल्यामुळे आज तेल आणि नैसर्गित वायू क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरचे दर 3.81 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाल्याचे दिसून आले.

बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 272 अंकानी कमी होऊन 35217 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 97 अंकानी कमी होऊन 10671 अंकावर बंद झाला.
क्रुडचे दर आणि जागतिक व्यापारयुद्धामुळे भारतातूनच नाही ती इतर विकसनशील देशातूनही परदेशी भांडवल परत जात आहे. त्यामुळे चलनांचे अवमूल्यन होत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 538 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणकूदारांनी 238 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक शेअरबाजारातही आज मंद वातावरण होते.
त्यातच काल रिझर्व्ह बॅंकेने सांगितले की, बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढत जाणार आहे. तसे झाले तर बॅंकांच्या भांडवल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्याची मनःस्थितीत आहेत. आज झालेल्या विक्रीमुळे सरकारी बॅंकांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले. ज्या बॅंकाचे शेअर घसरले त्यात पंजाब नॅशनल बॅंक, बडोदा बॅंक, स्टेट बॅंक, सिंडिकेट बॅंक , ओरिएंटल बॅंक आणि युनियन बॅंकेचा समावेश आहे. आयसीआयसीआय बॅंकेचा शेअर आज 3.16 टक्‍क्‍यांनी कमी झाला. मात्र, रुपया घसरत असल्यामुळे आयटी कंपन्या तेजीत आहेत. त्याचबरोबर औषधी कंपन्याचीही खरेदी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)