विक्री करात 25 लाखांचा अपहार

पिंपरी – विक्री कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे विश्‍वस्त व एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यापाऱ्याने सुमारे 24 लाख 81 हजार 301 रुपयांचा कर बुडवला आहे.

या प्रकरणी प्रकाश विठ्ठलराव कुलकर्णी (वय-41, रा. पिंपरी निलख, सहाय्यक राज्य कर आयुक्त, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (वय-45, रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपहार 1 एप्रिल 2012 ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनकर महाराष्ट्र शासनाचे विश्वस्त व एजंट म्हणून काम करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करदात्यांकडून विक्री कर गोळा करण्याचे काम करत असताना 1 एप्रिल 2012 पासून 4 ऑगस्ट 2018 पर्यंत त्यांनी नागरिकांकडून एकूण 24 लाख 81 हजार 301 रुपये एवढी कराची रक्कम गोळा केली. ही रक्कम शासनाकडे जमा न करता विक्री कर बुडविण्याच्या उद्देशाने स्वतःकडेच ठेवली. यावरून सोनकर यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यासह सह महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा कलम 2002 अन्वये कलम 48(5), 74(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)