विक्रीकर न भरल्याने महिला व्यावसायिकावर गुन्हा

पुणे – विक्रीकर न भरल्याने एका महिला व्यावसायिकावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेचा लोखंड विक्रीचा व्यवसाय आहे.
याप्रकरणी विक्रीकर अधिकारी रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित महिलेने 1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2009 या कालावधीत व्यवसायाचा विक्रीकर भरणे आवश्‍यक होते. मात्र तिने तो न भरता शासनाची 3,30,60,898 रुपयांची फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी. एम. वाघमारे तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)